Sansad Aadarsh Gram Yojana – आओ हम सब हात बढाऍ, और चिंचोटी को महाराष्ट्र का आदर्श गांव बनाऐं – डॉ. किरीट सोमैया

सासंद आदर्श गाव म्हणून अख्ख्या देशाला ज्याचा आदर्श वाटेल असे चिंचोटी गाव निर्माण करु असा संकल्प ईशान्य मुंबईचे खासदार डॉ. किरीट सोमैया यांनी नवीन वर्षाच्य़ा सुरुवातीलाच केला. सासंद आदर्श गाव म्हणून दत्तक घेतलेल्या रायगडमधल्या चिंचोटी गावात विकासयोजनेच्या शुभारंभ प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. सन 2016 पर्यंत चिंचोटी गावाचा संपूर्ण विकास होईल असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाला रायगड जिल्ह्यातले विविध खात्यातले मुख्य अधिकारी, जिल्हाधिकारी सुमंत भांगे, मोधाताई सोमैया, नील सोमैया, जिल्हानियोजन अधिकारी सुनील जाधव, आदि मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधानानी आखलेल्या सांसद आदर्श ग्राम योजनेचा मूळ उद्देश हा प्रत्येक गावाच्या पायाभूत, सामाजिक स्तर उंचवण्याचा आहे. यासाठी सर्वांनी एकसाथ काम करण्याची गरज आहे. सुरुवातीला प्रत्येक घरात स्वतंत्र शौचालय आणि स्वच्छता य़ावर प्राधान्याने भर देण्यात येईल तसेच यासाठी खासदार निधीतूनच 10 लाख रुपयांची निधीही देण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात सोमैया यांच्या हस्ते जन्म दाखले, जन-धन-योजेनेचे पासबूकाचेही वाटप करण्यात आले.यावेळी जिल्हा क्रीडा विभागातर्फेही गावाच्या व्यायामशाळा दुरूस्तीसाठी सात लाखाचा निधी यावेळी जाहीर केला.
यादरम्यान त्यांनी गावातील महिला वर्गाशीही संवाद साधला आणि आपला गावच्या स्वच्छतेसाठी आणि विकासासाठी पुढाकार घेण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. केंद्र सरकार आणि राज्य सरकारशी साथ घेऊन गावच्या संपूर्ण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 2015 हे विकासवर्ष असून, आओ हम सब हात बढाऍ, और चिंचोटी को महाराष्ट्र का आदर्श गांव बनाऐं असा संदेश यावेळी त्यांनी गावक-यांना दिला.

DSC_0356

DSC_0418

DSC_0441

DSC_0458

DSC_0468

DSC_0485

DSC_0509

DSC_0514

DSC_0533

DSC_0560

DSC_0571

DSC_0617

DSC_0652

DSC_0660

DSC_0665