Mumbai Railway Accident Control Meeting

#MumbaiRailway accident control meeting.
#Government and non-government agencies will take measures together. Will focus on the security and convenience of passengers

रेल्वे मार्ग अपघात नियंत्रणासाठी आढावा बैठक संपन्न

सरकारी आणि निमसरकारी यंत्रणा मिळून उपाययोजना करणार

50 ट्क्के अपघात रोखणार, प्रवासी सुरक्षा आणि सुविधेवर भर देणार- किरीट सोमैया

मुंबई रेल्वे मार्गावर होत असलेल्या अपघाताबाबत नुकतीच ( 23 सप्टेंबर, 2016) राज्याचे गृह मंत्रालय आणि शहर विकास मंत्रालयाने संयुक्तपणे मुंबई, ठाणे, कल्याण, वसई- विरार, मीरा-भाईंदर महानगरपालिकांचे आयुक्त, मध्य- पश्चिम रेल्वे अधिकारी, लोहमार्ग पोलीस आयुक्त, सिडको, एमएमआरडीए अशा एकूण 14 सरकारी यंत्रणांची एकत्रित बैठक घेतली. आजवरच्या इतिहासात रेल्वे सुरक्षेबाबत पहिल्यांदाच अशी एकत्रित बैठक पार पडली.
तासभर चाललेल्या बैठकीतील काही महत्त्वाच्या बाबी-

– मुंबईत दरदिवशी सरासरी 30 लोक रेल्वे अपघातात बळी पडतात. (त्यात १० मृत्यू, १० जखमी / अपंगत्व , १० सर्वसाधारण येते) – दरवर्षी १० हजार मनुष्य अपघात रेल्वे मार्गावर (मुंबई ते विरार मार्ग) होतात, – ही संख्या दोन वर्षात कमी करण्यासाठी विविध उपाय

त्यासाठी एक आराखडा तयार करण्यात आला आहे, त्यातील काही मुख्य बाबी –

– प्रत्येक प्लॅटफॉर्मची उंची ३१ मार्च २०१८ पर्यंत वाढवली जाणार, ( मध्य आणि पश्चिम रेल्वे)
उंची किमान ९०० मिलिमीटर वाढवली जाणार

– रेल्वे रुळ ओलांडण्याच्या 112 ठिकाणे अधोरेखित करण्यात आली असून, त्य़ाठिकाणी संरक्षित भिंत बांधण्यात येणार.

– दोन प्लॅटफॉर्ममधून रेल्वे रुळ ओलांडू नये म्हणून कुंपण घालणार (

– मुंबईच्या प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूंना किमान १-१ एस्कलेटर बसविले जाणार, पूर्व-पश्चिम दिशेला.

– प्रवाशांसाठी भुयारी मार्गचा सकारात्मक विचार- (चर्चगेट आणि सीएसटी सारखे)

– वरील सर्व उपाययोजना या केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महापालिका, रेल्वे मंत्रालय तसेच अन्य संस्थांच्या माध्यमातून होणार आहेत.

– खा. किरीट सोमैया हे संसदेच्या लोकलेखा समितीच्या रेल्वेसाठी असलेल्या उपसमितीचे समन्वयक असून ते गेले 7-8 महिने ते या विषयावर काम करत आहेत.