Mankhurd and Govandi stations will soon be transformed / मानखुर्द आणि गोवंडी स्टेशनचा लवकरच होणार कायापालट

मानखुर्द आणि गोवंडी स्टेशनचा लवकरच होणार कायापालट,
प्रवाशांच्या समस्या सुटणार

Mankhurd and Govandi stations will soon be transformed
On the issue of problems related to Mankhurd and Govandi Railway stations on Harbor line, Central Railway has accepted Kirit Somaiya’s suggestions for the development and changes, and the concrete steps have now been taken to ease the convenience of passengers.

According to the Central Railway General Manager Devendrakumar Sharma, Platforms Repairing, FOB width, ATVM repairing, removal of encroachments, platform repairing of the platform will be completed by December 2017.

हार्बर रेल्वे मार्गावरील कायम गर्दीच्या असणा-या मानखुर्द आणि गोवंडी रेल्वे स्थानकावरील समस्यांबाबत खासदार डॉ.किरीट सोमैया यांनी मध्य रेल्वेकडे काही बदल आणि दुरुस्ती बाबत सुचना पाठवल्या होत्या. मध्य रेल्वेने याबाबत केलेल्या पाहणीनंतर या स्थानकांचा कायापालट होणार असून एकंदर प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने आता ठोस पाऊले उचलली आहेत.
यामध्ये प्लॅटफॉर्म दुरुस्ती,रे्ल्वेफूट ओव्हर ब्रीजचे रुंदीकरण, एटीव्हीएम मशीनची दुरुस्ती,रेल्वे प्लॅटफॉर्म बाजूची अतिक्रमणं हटवणे, प्लॅटफॉर्मच्या छत दुरुस्तीचे कामं ही सर्व कामे डिसेंबर २०१७ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्रकुमार शर्मा यांनी पत्राद्वारे दिली आहे.
यातील काही मुख्य मुद्दे पुढीलप्रमाणे,
1. प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील ब्रीज एस.एम.ऑफिस येथील म्हाडाच्या प्लॉटपर्यंत रुंदीकऱणाची प्रक्रिया महानगरपालिकेचे प्रपोजल आल्यानंतर सुरू केली जाणार
2. प्लॅटफॉर्म क्रमांक ३ च्या दुरुस्तीचे नियोजन करण्यात आले असून ते काम जानेवारी २०१८ पर्यंत पूर्ण होणार
3. प्लॅटफॉर्म क्रमांक ३ मधील ट्रॅक खाली असल्याने तेथे पाण्याचा निचरा होण्यासाठी इतर उपाययोजना करता येतील का याबाबत विचारविनिमय सुरू
4. प्लॅटफॉर्मवरील छत गळतीचे काम प्रगतीपथावर सुरु असून ते ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत सदर काम पूर्ण होणार
5. नादुरूस्त ७० एटीव्हीएम मशीन दुरूस्त करण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. तसेच येथे नवीन १११ एटीव्हीएम मशीन बसविण्याचा प्रस्तावर लवकरच संमत होईल. तो संमत झाल्यावर त्वरित नवीन मशीन स्थानकांवर लावण्यात येणार आहेत.
6. गोवंडी आणि मानखुर्द रेल्वे स्थानकांवर रेल्वे पोलिसांचा संख्या ही गरजेनुसार वाढवण्यात येणार
7. ३० मे, २०१७ पर्यंत मानखुर्द स्थानकाजवळील ४० अतिक्रमणांची प्रकरणे काढण्यात आली असून अतिक्रमणाची कारवाई सातत्याने सुरू आहे.
8. स्थानकावरील गर्दी आटोक्यात आणण्यासाठी रेल्वे प्रशासन सीएसटी ते मानखुर्द या दरम्यान फास्ट कोरिडोरबाबत विचार सुरु असून त्यातील अडथळे दूर झाल्यास या मार्गावर जलद लोकल सेवा सुरू करता येणार आहे.

Scan0004_Page_1

Scan0004_Page_2