Inaugurated Passport Office at Vikhroli to facilitate 42 lac people of Eastern Suburbs of Mumbai

खासदार डॉ. किरीट सोमैया यांच्या प्रयत्नाने ईशान्य मुंबई येथे खुले झाले नवे पासपोर्ट सेवा केंद्र

ईशान्य मुंबईतील 42 लाख नागरिकांना मिळाला मोठा दिलासा.

आज दि. १ मार्च रोजी सुरू झाले विक्रोळीत नवे पासपोर्ट केंद्र.

ईशान्य मुंबई खासदार डॉ. किरीट सोमैया यांच्या प्रयत्नांना यश .

ईशान्य मुंबई उपनगरवासियांना त्यांच्या हक्काचं पासपोर्ट सेवा केंद्र मिळवून देण्यासाठीचा खासदार डॉ. किरीट सोमैया यांच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळालं आहे . विक्रोळीच्या कन्नमवारनगर परिसरात असलेल्या पोस्ट कार्यालयात हे पासपोर्ट सेवा केंद्र खुले झाले आहे.

महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यालयाचे उद्घाटन झालं. खासदार डॉ.किरीट सोमैया हे या पासपोर्ट सेवा केंद्राचे प्रमुख उद्घाटक होते.

या आधी नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी अंधेरी किंवा वरळी येथे जावे लागत होते, परंतु आता विक्रोळीत पासपोर्ट सेवा केंद्र खुले झाल्यामुळे 42 लाख ईशान्य मुंबई उपनगरवासीयांना दिलासा मिळाला आहे. दि. 5 मार्च पासून या पासपोर्ट सेवा केंद्रात ऑनलाईन अर्ज भरलेल्या नागरिकांच्या मुलाखती आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यास सुरवात होईल.