Felicitation of Teachers of Mulund ‘शिक्षक सन्मान – गुरू द्रोणाचार्य ‘ पुरस्कार

Yuvak Pratishthan’s Guru Dronacharya Puraskar – Felicitation of Teachers of Mulund

Not an award but gratitude towards the noble profession

MP Kirit Somaiya today felicitated 182 teachers of Mulund for their excellence during a programme organized by Yuvak Pratishthan NGO in presence of its Gen. Secretary Dr. Medha Somaiya, MLA Sardar Tarasing and other dignitaries.

The teacher were felicitated with a Certificate from HRD Ministry as well as Certificate from Yuvak Pratishthan and a Shawl.

‘शिक्षक सन्मान – गुरू द्रोणाचार्य ‘ पुरस्कार

मुलुंड मधील 182 शिक्षकांचा गौरव

खा.किरीट सोमैयांनी घेतला पुढाकार

शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला ईशान्य मुंबईचे खा.किरीट सोमैया यांनी आज मुलुंड मधल्या 182 शिक्षक आणि 10 प्राचार्यांना युवक प्रतिष्ठान पुरस्कृत शिक्षक सन्मान – गुरु द्रोणाचार्य  पुरस्कार देऊन गौरवले. यावेळी युवक प्रतिष्ठानचे महासचिव डॉ. मेधा सोमैया, आमदार सरदार तारासिंग आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

गुरू देवो नम: या उक्तिनुसार गुरुचे स्थान हे आपल्या जीवनात सर्वोच्च असते, ते आपले मार्गदर्शक तर असतातच, पण त्यांच्याच अथक प्रयत्नांनी अनेक पिढ्या घडल्या आणि घडतीलही, यासाठीच त्यांचा सन्मान झालाच पाहिजे असा विश्वास खा.किरीट सोमैया यांनी यावेळी व्यक्त केला.

या पुरस्काराच्या रुपाने शिक्षकांना मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या वतीने प्रामाणपत्र आणि शाल- श्रीफळ देऊन यथोचित गौरवण्यात आले. मुलुंडकर नागरिकांनी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.

‘शिक्षक सन्मान – गुरु द्रोणाचार्य’ पुरस्काराची सुरुवात आज मुलुंडमधून झाली. ईशान्य मुंबईतल्या सर्वच विभागातून ज्या ज्या शिक्षकांनी आपल्या क्षेत्रात विशेष योगदान दिले आहे अशा कर्तृत्ववान शिक्षकांना हा सन्मान देऊन गौरवण्यात येणार आहे.

Click Here To View Photo