Felicitation of Teachers of Bhandup ‘शिक्षक सन्मान – गुरू द्रोणाचार्य‘ पुरस्कार

Not an award but gratitude towards the noble profession

MP Kirit Somaiya today felicitated 162 teachers of Bhandup for their excellence during a programme organized by Yuvak Pratishthan NGO.

The teacher were felicitated with a Certificate from HRD Ministry as well as Certificate from Yuvak Pratishthan and a Shawl.

भांडूप मधल्या 162 शिक्षकांचा ‘शिक्षक सन्मान ‘ गुुरु द्रोणाचार्य पुरस्काराने गौरव 
खा.किरीट सोमैयांचा पुढाकार

शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला ईशान्य मुंबईचे खा.किरीट  सोमैया यांनी  सुरु केलेल्या शिक्षक सन्मानाच्या दुस-या टप्प्यात आज भांडुपमधल्या
155 शिक्षक आणि 7 प्राचार्यांना ‘शिक्षक सन्मान गुुरु द्रोणाचार्य ‘ पुरस्कार देऊन गौरवले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सोहऴा आहे अशी भावना यावेळी खा.किरीट सोमैया यांनी व्यक्त केली.
गुरू देवो नम: या उक्तिनुसार गुरुचे स्थान हे आपल्या जीवनात सर्वोच्च असते, ते आपले मार्गदर्शक तर असतातच , पण त्यांच्याच अथक प्रयत्नांनी अनेक पिढ्या घडल्या आणि घडतीलही, यासाठीच त्यांचा सन्मान झालाच पाहिजे.

या पुरस्काराच्या रुपाने शिक्षकांना मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या वतीने प्रामाणपत्र आणि शाल- श्रीफळ देऊन यथोचित गौरवण्यात आले.

ईशान्य मुंबईतल्या सर्वच विभागातून ज्या शिक्षकांनी आपल्या क्षेत्रात विशेष योगदान दिले आहे अशा कर्तृत्ववान शिक्षकांना हे पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.