Dr. Kirit Somaiya met Maharashtra Home Minister R. R. Patil on the issue of Adarsh Scam and Ghatkopar Railway accident.

AdarshScam – Demanded an explanation within 7 days on the role of government in the governor not allowing CBI to prosecute Ashok Chavan and CBI’s request to withdraw Ashok Chavan’s name from the chargesheet Or else BJP & Kirit Somaiya will go to court on this.

आदर्श प्रकरणात अशोक चव्हाण यांच्यावर सीबाआयला परवानगी नाकारताना राज्यपालानी मंत्रीमंडलाचा सल्ला विचारला नव्हता, अशी खलबलजनक माहिती समोर आहे. आदर्श प्रकरणात अशोक चव्हाण यांच्यावर पोलिस खटला दाखल करत नसून त्यासाठी ते सीबीआयचे कारण पुढे करीत आहेत, तर सीबीआयने अशोक चव्हाण यांना वगलण्याची मागणी केली आहे, याबाबत न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न घेऊन भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज मंत्रालयामध्ये गृहमंत्री आर आर पाटील यांची भेट घेतली.

सोमय्या यांनी गृह, सामान्य प्रशासन, िवधी आणि न्याय, गृहनिर्माण विभागाकडे याबाबत पाठपुरावा केला होता त्यानंतर आज खुद्द गृहमंत्रालयाची भेट घेतली. यासंदर्भात भूमिका पुढील सात दिवसात स्पष्ट न केल्यास न्यायालयात भाजपा या प्रकरणात सहभागी करून घेण्याचा अर्ज करेल, असे सोमय्या यांनी यावेली स्पष्ट केले.

Ghatkopar Railway Accident.- After meeting with Dr. Somaiya, the Home Minister accepted the negligence of Railways caused the accident and issued directives to file a complaint against railways on grounds of negligence.

मुंबईतील रेल्वे लोकल अपघातात आपले दोन्ही हा़त गमावणा-या मोनिका मोरेचा अपघात हा रेल्वेच्या गलथानपणामुले झाला असून याबाबत गुन्हेगारी स्वरूपाचा खटला दाखल करावा अशी मागणीही किरीट सोमय्या यांनी केली. ही मागणी आर आर पाटील यांनी मान्य केली असून तसा खटला दाखल करावा असे आदेश त्यांनी दिले.