Do not Scurry to Catch Trains

“Do not scurry to catch trains” Somaiya again appealed to #Mumbaikars.

MP #KiritSomaiya visited #JupiterHospital today to see Kalyan train accident victim #SayaliDhamdhere, a Junnar resident came to Mumbai to attend IAS exam, met with an accident while catching train, lost her legs.

Somaiya already has taken initiatives and working on various measures to reduce cases of railway accidents, action plan has been prepared and improvements can be seen. The #PlatformHeight is to be increased by Dec 2018. #RailCommuterAwarenessCampaigns are being implemented.

Somaiya will provide #ModernArtificialLimb (legs) to Sayali to give her a new life.

कल्याण एक्सप्रेस अपघात प्रकरण : आयएएसची परीक्षा देण्यासाठी जुन्नरहून मुंबईला आलेल्या सायली ढमढेरे या युवतीचा काल कल्याणला एक्सप्रेसमध्ये चढताना अपघात झाला. यात तिला तिचा पाय गमवावा लागला. या अपघातप्रकरणी ईशान्य मुंबईचे खा.किरीट सोमैया यांनी तिची ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात जाऊन तिच्या नातेवाईक, डॉक्टर यांची भेट घेतली आणि विचारपूस केली.

गेले काही महिने खा.किरीट सोमैया मुंबई रेल्वे अपघात प्रकरणांच्या विविध उपाययोजनांवर काम करत आहेत, यासाठी एक एक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे, त्यामुळे सध्या काही सुधारणा झाल्या आहेत. मध्य रेल्वेतील सर्व प्लॅटफॉर्मची उंची ही डिसें 2018 पर्यंत वाढवली जाणार आहे. प्रवाशांसाठी जनजागृतीचे कॅम्पेन रेल्वे, महापालिका आणि सरकारतर्फे राबवले जात आहे. यावेळी खा. किरीट सोमैया यांनी पुन्हा मुंबईकरांना आवाहन केले आहे. एक लोकल सुटली तरी चालेल पण लोकल ट्रेन पकडण्यासाठी धावपळ करु नका.

सायलीला अचानक झालेल्या अपघाताने नवी उभारी देण्यासाठी खा.किरीट सोमैया अत्याधुनिक कृत्रिम अवयव (पाय) देणार आहेत.