BMC Tanker Mafia Pani Ghotala

BMC Tanker Mafia Pani Ghotala.

Somaiya today visited Tanker Mafias’ office at Mahul Pipeline and submitted representation / documents to CM Devendra Fadnavis for further action.

खा.किरीट सोमैयांनी केला मुंबईत टॅंकरमाफियांचा पर्दाफाश

मुंबईत महानगरपालिकेने सुरवातीपासूनच 20 टक्के पाण्याची कपात करुन मुंबईचा पाणीपुरवठा सुरळीत केला मात्र दुसरीकडे उपनगरात ज्या ठिकाणी पाण्याचा जोर कमी आहे अशा जवळजवळ 50 हून अधिक ठिकाणी टॅंकरमाफियांची सध्या चलती सुरु आहे. याबाबतच्या अनेक तक्रारी खा. सोमैया यांच्याकडे आल्यानंतर आज अंधेरी पूर्व जेबी नगर जवळ अचानक धाड टाकून या पाणीमाफियांचा पर्दाफाश करण्यात यश आले आहे.

मुंबईत या पाणीमाफियांनी ठिकठिकाणी फिलिंग स्टेशन ( बोरच्या माध्यमातून) उभारून , पालिकेची कोणतीही परवानगी न घेता, पाण्याच्या नमुन्याची कोणतीही तपासणी न करता हे पाणीमाफिया टॅंकर भरत असल्याचे वास्तव पुढे आले आहे. ते पूर्णत: अनधिकृत आहे. अंधेरी पोलीसांच्या मदतीने आता लवकरच या प्रकरणाचा उलगडा होणार आहे.