4G Tower : Somaiya lodged FIR against Reliance Contractor

Opposing Installation of ‪#‎4GTowers‬ at Gardens,Schools and Hospitals in Mumbai, MP Dr. Kirit Somaiya lodges an FIR against Reliance Contractors
Today,Mumbai North-East MP Dr. ‪#‎KiritSomaiya‬ filed an FIR with the Police at Mulund Police Station against the contractors of Reliance.
Dr. Somaiya had earlier visited ‪#‎AshokNagar‬ in ‪#‎Mulund‬ where a 4G tower has been setup at the sole open playground in the area.Despite protests by the residents, the contractors installed the tower overnight without the required permissions.
An FIR under sections 269,506(2), 34-270 has been filed against the contractors.
Last year in March 2014, the Congress-NCP government in Maharashtra, by means of the Green Lodge Development Guidelines for installing mobile towers in open spaces, had given permissions to install 1160 4G Towers in Mumbai.
If such permissions are given to multiple telecom operators then open spaces and gardens in Mumbai will be encroached. Dr.Somaiya has requested the TRAI (Telecom Regulatory Authority of India) to take a serious note of this issue.
Dr. Somaiya has also taken up this issue with the Chief Minister of Maharashtra and the BMC officials and requested them to review the Green Lodge Development Guidelines of March 2014.

4 जी टॉवर विरोधात रिलायन्स कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल

मुंबईत उद्यानाच्या, हॉस्पिटल आणि शाळेच्या जवळ उभारल्या जाणा-या 4 जी टॉवर विरोधात आज ईशान्य मुंबईचे खासदार डॉ. किरीट सोमैया यांनी रिलायन्स कंपनीच्य़ा कॉ्न्ट्रॅक्टरविरोधात मुंलुंड (पश्चिम) पोलीस स्थानकात एफआय़आर दाखल केला आहे. अशोक नगर परिसरात परवानगीशिवाय उभारल्या गेलेल्या 4 जी टॉवरची पाहणी आज सकाळी डॉ. सोमैया यांनी केली त्यावेळी स्थानिकांनी निवेदन देऊन या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती.
मुलुंडच्या अशोक नगर परिसरात महानगरपालिकेचे एकमेव खेळाचे मैदान असून याच मैदानावर 4 जी टॉवर उभारण्यात आला आहे. रिलायन्सच्या कॉन्ट्रॅक्टरने कोणताही अधिकृत परवाना न घेता, स्थानिक रहिवाशांचा विरोध न जुमानता मध्यरात्रीच, मागील आठवड्या 4 जी टॉवरचे काम पू्र्ण केले होते.
डॉ.किरीट सोमैया यांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार आता कॉन्ट्रॅक्टर वर भादवि कलम 269,506(2) 34-270 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
याआधी आघाडी सरकराने ग्रीन लॉज डेव्हलपमेंट गाईडलाईन्सच्या माध्यमातून मार्च 2014 ला मोकळया जागेवर 4 जी टॉवर उभारण्यासंदर्भात जीआऱ काढला होता आणि त्यानंतर 1160 4 जी टॉवर बांधण्याची परवानगी दिली होती. अशाप्रकारे विविध मोबाईल कंपन्यांना परवानग्या मिळत गेल्या तर मुंबईत खुली मैदाने, आणि उद्यानांवर अतिक्रमण होईल. ही बाब डॉ. सोमैया यांनी ट्राय (Telephone Regulatory Authority of India) निदशर्नास आणली असून याबाबत लवकरात लवकर दखल घेण्याचीही विनंती केली आहे.
यासंदर्भात डॉ.सोमैया यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पालिकेच्या अधिका-यांनाही मार्च 2014च्या ग्रीन लॉज डेल्हलपमेंट जीआरबाबत फेरविचार करण्याची विनंती केली आहे.

1

2

Image (367)

Image (368)

Image (369)

Image (370)