45 crores sanctioned for water purification of the Powai Lake

पवई तलावातून मुंबईकरांच्या वाट्याला दूषित पाणी तलावातील पाण्याच्या शुद्धतेसाठी पालिकेतर्फे ४५ कोटी रूपये मंजूर

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी पवई तलावाची पाहणी केली. त्याचबरोबर तलावातील पाण्याचा दर्जाही तपासण्यात आला. या पहाणीत पाण्यामध्ये आरोग्यास हानी पोहोचविणाऱ्या घटकांचे प्रमाण दिसून आले आहे.

पवईलेकच्या शुशोभिकरणाबाबत अतारांकित प्रश्नाच्या माध्यमातून खा.किरीट सोमैया यांनी विचारलेल्या प्रश्नाला केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री डॉ.महेश शर्मा यांनी दिलेले उत्तरातून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

पवई तलावाजवळ 22 अशी ठिकाणे आहेत जिथून प्रात्यक्षिकरित्या मानवी नियंत्रण केले जाते, त्या ठिकाणाहून सांडपाणी ( ज्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही) ते सोडले जाते.

आजूबाजूच्या झोपडपट्टी भागांतून निघणारे सांडपाणी विविध उंदचन केद्रात एकत्र करुन त्यावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे.

ऑक्सिजनची पातळी 0.0 mg/l to 5.4 mg/l

बायोकेमिकल ऑक्सिजन 7mg/l to 150 mg/l

घनकचरा 308 mg/l to 328 mg/l

रासायनिक ऑक्सिजन 96mg/l to 496mg/l

योग्य घनकचरा व्यवस्थापन, त्याचबरोबर मूर्ती विसर्जनासाठी प्लॅस्टिक विघटन प्रक्रियाही करणे गरजेचे आहे. यासाठी महापालिकेच्या माध्यमातून पवई तलाव सुशोभिकरण व पाणी स्वच्छतेसाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. त्यासाठी 45 कोटी रुपये देण्यात आले आहेत.