40 Camps 10000 Beneficiaries in Ishanya Mumbai today on PM Narendra Modi Birthday

#HappyBirthdayPM #SevaDiwas
40 Camps organised by #YuvakPratishthan #KiritSomaiya
More than 10000 Beneficiaries in #IshanyaMumbai today on occasion of PM Narendra Modi Birthday

मा . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ईशान्य मुंबईत 40 आरोग्य मेळावे संपन्न
श्रवणयंत्र ( कानाचे मशीन) आणि मोतीबिंदू कॅम्प
10 हजार नागरिकांनी घेतला लाभ

नागरिकांच्या सृदृढ आणि निरामय आरोग्याच्या दृ्ष्टीने मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने ईशान्य मुंबईत खा. किरीट सोमैया यांनी श्रवणयंत्र Hearing Aid आणि मोतीबिंदू तपासणी आरोग्य मेळाव्यांचे आयोजन आज ( 17 सप्टेंबर, 2017) करण्यात आले. 

ईशान्य मुंबईत मुलुंड,भांडुप – प्रताप नगर, साईनगर, विक्रोळी, मानखुर्द, घाटकोपर अशा एकूण ४० ठिकाणी हे आरोग्य आयोजित केली होती. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभाग घेतला.

Hearing Aid ऐका स्वाभिमानाने या उपक्रमाची सुरवात २३ ऑगस्टला केंद्रीय सामाजिक आणि न्यायमंत्री थावरचंद गेहलोट यांच्या हस्ते मुलुंडमधून झाली, त्यावेळी १९२ ज्येष्ठ नागरिकांना कानाची मशीन श्रवणयंत्र वाटप करण्यात आले. आगामी काळात ज्येष्ठ नागरिकांना निव्व्ळ ५०० रुपये अशा रास्त दरात ही मशीन उपलब्ध होणार आहे.