2019च्या निवडणुकीपासून मतनोंदणीची पावती मिळणार VOTERS TO GET RECEIPT AFTER CASTING VOTES IN 2019 POLLS

VOTERS TO GET RECEIPT AFTER CASTING VOTES IN 2019 POLLS
Mar 16, 2017, 10:29 PM
Mumbai – The Central Election Commission (CEC) will give the receipt after casting your vote in the Electronic Voting Machine (EVM) during the Lok Sabha elections in 2019. The expected cost of this project is Rs 5,412 crore and Central government has approved Rs 1,009 crore for this initiative.
The contract for this adjustment in the EVMs has been awarded to ECIL and BEL which are undertakings of the Union government. The CEC had conducted many tests in this regard during 2008-2010. The CEC had taken the consent of all the political parties on issuance of the receipt to voters. The CEC has informed this to BJP MP Kirit Somaiya.
The BJP has performed very well in the recently conducted municipal corporation and local governing bodies election in the state. The Shiv Sena and opposition parties had taken objections on the EVMs. The BJP also won five state assembly election recently and the BSP supremo Mayawati had also raised doubts on the EVMs though the CEC had refuted all these charges. On this backdrop, Somaiya had demanded the issuance of receipt to voters after casting their votes.
Reporter : Manoj Kulkarni
Visual : Mumbai Live Network

2019च्या निवडणुकीपासून मतनोंदणीची पावती मिळणार
Mar 16, 2017, 06:29 PM
मुंबई – केंद्रीय निवडणूक आयोग 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकांपासून इव्हीएम मशिनमध्ये मतनोंदणी रिसिटचा वापर करणार आहे. या प्रक्रियेसाठी अंदाजे 5 हजार 412 कोटी रूपयांचा निधी अपेक्षित आहे. डिसेंबर 2016 मध्ये केंद्र सरकारने 1 हजार ९ कोटी रूपये मंजूर केले आहेत, अशी माहिती किरीट सोमय्यांनी ‘मुंबई लाइव्ह’ला दिली.
केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या इसीआयएल आणि बीईएल या कंपन्यांना याचे कंत्राट देण्यात आले आहे. 2008 आणि 2010 मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत बऱ्याच ट्रायल घेतल्या होत्या. सर्व पक्षांना याबाबत विश्वासात घेऊन मतनोंदणी रिसिटचा वापर करण्यावर सहमतीही घेतली होती.
राज्यात झालेल्या नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाने नेत्रदीपक कामगिरी केली. राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने आणि विरोधी पक्षांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतला. त्यानंतर देशातल्या 5 राज्यात निवडणुका झाल्या. त्यातही भाजपाने जोरदार कामगिरी केली. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचे प्रथमच 324 इतके आमदार निवडून आले. निकालानंतर बसपाच्या मायावतींनी ईव्हीएम मशीनबद्दल हरकत घेत या निकालावर प्रश्नचिन्ह उभे केले होते. निवडणूक आयोगाने मात्र या सर्व आरोपांचा इन्कार केला. भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे मतदान झाल्यावर त्याची पावती मतदारांना द्यावी अशी मागणी केली होती.
रिपोर्टर : मनोज कुळकर्णी
व्हिज्युअल : मुंबई लाइव्ह नेटवर्क

http://marathi.eenaduindia.com/Mumbai/MumbaiCity/2017/03/16215417/News-In-Marathi-From-2019th-election-voter-will-get.vpf

EVM-paper-trial (1)

EVM-paper-trial