10000 ज्येष्ठ नागरिकांना Hearing Aid वाटप कार्यक्रमाचे शुभारंभ by Central Minister Thavarchand Gahlot

ऐका स्वाभिमानाने
– खासदार डॉ.किरीट सोमैया

उतार वयात जेष्ठ नागरिकांना कानाने कमी एकू येत असल्याच्या अनेक तक्रारे येतात.अश्या परिस्थितीत वावरतांना त्यांना कमी एकू येत असल्यामुळे अनेक अडचणीना सामोरे जावे लागते. अश्या वेळेला जेष्ठ नागरिकांना डॉक्टर (Hearing Aid) कानाची मशीन लावण्याचा सल्ला देतात. परंतु हि (Hearing Aid) नागरिकांच्या अवाक्या बाहेर असल्यामुळे अनेक जण आपले उर्वरित आयुष्य ह्या आजारात घालवतात. नेमकी हीच गरज लक्ष्यात घेता खासदार किरीट सोमैया यांच्या संकल्पनेतून “ऐका स्वाभिमानाने” हा उपक्रम सुरु केला आहे. ह्याचा शुभारंभ सामाजिक न्याय व विकास मंत्री श्री.थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते मुलुंडच्या वामनराव मुरंजन शाळेच्या सभागृहात झाला. श्री.गेहलोत यांनी खासदार किरीट सोमैया व त्यांच्या परिवाराकडून करण्यात येणाऱ्या अश्या कामांचे कौतुक केले तसेच त्यांना कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास मदत करणार असल्याचे सांगितले. या वेळी अनेक दिव्यांग(एकू न येणाऱ्या) जेष्ठ नागरिकांना (Hearing Aid) कानाची मशीन वाटप करण्यात आले.
पुढे येत्या काळात अश्या 10,000 जेष्ठ नागरिकांना ह्या (Hearing Aid) कानाच्या मशीनचे वाटप करण्याच्या संकल्प खासदार किरीट सोमैयांनी त्यांच्या युवक प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेतला आहे.
ह्या कार्यक्रमानिमित्त युवक प्रतिष्ठानचे सचिव श्रीमती.मेधा सोमैया, आमदार श्री.राम कदम, माजी आमदार श्री.मंगेश सांगळे, नगरसेवक प्रकाश गंगाधरे, नगरसेविका रजनी केणी, नगरसेवक नील सोमैया, ईशान्य मुंबई अध्यक्ष श्री.नरेश चंदाराणा आणि बीजेपी कार्यकर्ता यांनी उपस्थिती दर्शवली.