मुलुंड डम्पिंग ग्राउंड 30 जून 2017 पासून बंद करणार-Kirit Somaiya leads newly elected BMC corporators to Mulund dumping ground

आज खासदार किरीट सोमैया यांनी महापालिका अधिकाऱ्यांसोबत मुलुंड डम्पिंग ग्राउंड येथे भेट दिली. या भेटीत त्यांनी तेथील स्थानिक व कचरा गोळा करणाऱ्यांशी चर्चा केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी संपूर्ण डम्पिंगची पाहणी केली असता त्यात त्यांना असे आढळून आले कि, तेथे लावलेले GPS सिस्टम आणि वजन काटा ह्यामध्ये पारदर्शकता नाही त्यात अजूनही घोळ सुरूच आहे.
या सर्व त्रुटी लक्षात घेता डम्पिंग ग्राउंड येथे CCTV लावणे गरजेचे आहे असे खासदार सोमैया यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.
30 जून 2017 ला मुलुंड डम्पिंग ग्राउंड पूर्णपणे बंद केले जाणार आहे. कशा पद्धतीने बंद करावे. याबाबत पालिका प्रशासन, केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून एक Action Plan तयार करणार आहेत. प्रत्येक 15 दिवसांनी याबाबत Review मिटिंग घ्यावी असे ठरले.
1. मुलुंड डम्पिंग ग्राउंड 30 जून 2017 ला बंद करणार
2. डम्पिंग संबंधात जे Restriction लागले आहे त्या संबंधात महापालिकेने हायकोर्टात Approach करावे असे आव्हान किरीट सोमैयानी केली आहे.
3. मुलुंड डम्पिंग ग्राउंडमध्ये येणार कचऱ्याच्या संबंधित पारदर्शकता अभाव आहे हे लक्षात आणून दिले.
4. यासंबंधी मुख्यमंत्र्यांशी किरीट सोमैयांनी चर्चा केली.