मुंबई महापालिका माफियांच्या रावणाचे दहन

मुंबई महापालिका माफियांच्या रावणाचे दहन
खा.किरीट सोमैयांनी केले दहन
*त्यानंतर शिवसैनिकांनी केला हल्ला
रावण दहनाचा कार्यक्रम दडपल्याचे चुकीचे*
खा.किरीट सोमैयांची स्पष्टोक्ती

दसरानिमित्त आज मुलुंड पूर्व येथील निलमनगर परिसरात खा.किरीट सोमैया यांनी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार माफियांच्या रावणाचे दहन केले. हा कार्यक्रम संपवून दुस-या कार्यक्रमाला जात असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी येऊन खा.किरीट सोमैयांवर हल्ला केला. 3 बस भरुन हे माफिया इथे आले होते. यामध्ये त्यांनी महिला कार्यकर्त्यावरही हल्ला केला. यात मिनाक्षी गायकवाड, सारिका अखाडे, प्रतिभा लाटकर, योगिता साळवी यांना दुखापत झाली आहे. यात 8-10 कार्यकर्तेही जखमी झाले आहेत. हे सप्व रावण दहनाचा कार्यक्रम पार पडल्यावर झाले.
गेल्या वर्षभरापासून खा.किरीट सोमैयांनी मुंबई महापालिकेतील डंम्पिग घोटाळा, नालेसफाई, टॅब घोटाळा, टॅंकर घोटाळा, रस्ते/ खड्डे घोटाळा अशी विविध प्रकरण पुढे आणून महापालिकेतील माफियाराज उघडकीस आणले आहेत, त्याचे सबळ पुरावेही आहेत. भ्रष्टाचारमुक्त प्रशासन सध्या हा संघर्ष सुरु आहे आणि पुढेही असाच सुरु राहणार आहे

dusshera2016-1