माफिया हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची सोमैयांची मागणी – Letter written to Mumbai Police Commissioner

खा. किरीट सोमैयांनी लिहिले मुंबई पोलीसआयुक्त दत्तापडसालगीकर यांना पत्र
मला जीवे मारण्याचा प्रयत्न करणा-या माफिया हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची सोमैयांची मागणी

दसराच्या दिवशी मुलुंड निलमनगरमध्ये रावणदहनाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या जीवघेणा हल्ल्याप्रकरणी खा. किरीट सोमैयांनी मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसालगीकरांना पत्र लिहिले आहे.

मला जीवे मारण्याचा प्रयत्न करणा-या माफिया हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची सोमैयांची मागणी केली आहे.

हल्ला करणा-या १३ लोकांना आपण ताब्यात घेतले. यातील काही गोष्टी आपल्या निदर्शनास आणून द्यायच्या आहेत.

शंभरहून अधिक जण माझ्यावर हल्ला करण्यासाठी वाहनांमध्ये तयार होते

प्रतिकात्मक माफियारूपी रावणाचे दहन केल्यानंतर, भाजपाचे कार्यकर्ते निघाल्यानंतर मी माझ्या गाडीकडे वळल्यानंतर माझ्याव हत्यारांनी हल्ला करण्यात आला काही जणांनी ठरवून नियोजित हल्ला माझ्यावर करण्यात आला

या हल्ल्यामागे काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, गट आहेत
हल्ला करणारे तरूण हे प्रतिकात्मक माफियारूपी रावणाच्या दहनाचा कार्यक्रम संपण्याची वाट पाहत होते
कार्यक्रम संपल्यानंतर भाजपाचे कार्यकर्ते गेल्यानंतर दबा धरून बसलेल्या काही तरूणांनी माझ्यावर अचानक हत्यारांनी हल्ला केला
पोलीस खात्याने मला संरक्षणासाठी दिलेल्या अंगरक्षकामुळे माझा जीव वाचला
हल्लेखोरांच्या हल्ल्यापासून मला वाचवत असताना भाजपाच्या ७ कार्यकर्त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यात ३ महिला आहेत
मुंबई पालिकेतील ५ हजार कोटी रूपयांच्या भ्रष्टाचारा विरोधात बोललो म्हणून माझ्यावर हल्ला करण्यात आला आहे