पवई, हिरानंदानी हॉस्पिटल किडनी रॅकेट स्कॅम

खा. किरीट सोमैयांनी केली सखोल चौकशीची पोलीस आयुक्ताना मागणी

मुंबईतल्या सोकॉल्ड मल्टिस्पेशॅलिटी म्हणून घेणा-या पवईच्या हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपण घोटाळा सापडला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी खा.किरीट सोमैया यांनी केली आहे. त्या संदर्भात तसे पत्र त्यांनी राज्याचे आरोग्य मंत्री आणि पोलीस आयुक्तांना लिहिले आहे.

यातील काही तथ्य अशी

– मुंबईत 20 रुग्णालयांत आरोग्य प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येते.
– किडनी रॅकेटमधला मुख्य आरोपी राजेंद्र बिसेन याचे याआधी 2007 मध्येही अशा प्रकारच्या किडनी रॅकेटमध्ये नाव पुढे आले होते.
– बिसेन गरिबांना किडनी दान करण्यासाठी फसवत असे.
– बिसेनने यासाठी डझनहून अधिक बनावट कागदपत्रे तयार केली होती.
– किडनी देणा-यांना निव्वळ 30-50 हजार रुपये तो देत होता.
– श्रीमंत रुग्णांकडून मात्र 40-50 लाख बळकवायचा.
– यामध्ये बिसनने भिका-यांनाही फसवले. त्यांना निव्वळ20-25 हजार देत होता.
– मात्र यासंदर्भात कधीच डॉक्टरांची सखोल तपासणी झाली नाही.

सोमैया यांची मागणी

– किडनी रॅकेट प्रकरणाची आयपीएस अधिका-याची नियुक्ती करुन सखोल चौकशी करण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी

– गेल्या 5 वर्षातील किडनी प्रत्यारोपणाची चौकशी
– गेल्या वर्षभरातील किडनी दात्याचे आणि रुगणांचे कागदपत्रे तपासावीत
– बिसेनच्या किडनी रॅकेटचे सर्व पुराव्यांची आणि कागपत्रांची शहानिशा व्हावी.
– सर्वात महत्त्वाचे म्हणजे किडनी प्रत्यारोपणासाठी कायदेशीर सुसज्ज यंत्रणा निर्माण व्हावी.

Click here for Letter written to Mumbai Police Commissioner and Health Minister Maharashtra demanding investigation and immediate action