खड्डे दुरुस्ती माफिया घोटाळा

खड्डे दुरुस्ती माफिया घोटाळा
रस्ते घोटाळे माफियांवरही लवकरच कारवाई होणार – किरीट सोमैया

मुंबईतले खड्डे बुजवण्यासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले असून, गेल्या काही वर्षात मुंबई महानगरपालिकेने वाटोळं केले असून त्याची प्रचिती नालेसफाई, टँकरमाफिया आणि आता रस्ता घोटाळ्यातून पुढे येत आहे अशी टिका ईशान्य मुंबईचे खा.किरीट सोमैया यांनी केली आहे.

आज सोमैया यांनी मुलुंड चेकनाका ते घाटकोपर एलबीएस रस्त्याची पालिका अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पाहणी केली आणि तसे पुरावेही दाखवले.

पालिकेला एक खड्डा बुजवायला 10 हजार खर्च येतो मात्र कंत्राटदार निव्वळ 50 रुपयांची मलमपट्टी टाकून खड्डे बुजवतात.यात गेल्या 5 वर्षात 182 कोटी रुपये खर्च झाले आहेत. मुंबईतल्या 100 खड्ड्यांचे पुरावे आणि व्हिडिओ क्लिपिंग्स येत्या मंगळवार १२ जुलैला ते महापालिका आयुक्त अजोय मेहता आणि महापौरांनाही सादर करणार आहेत.

नुकत्याच दोन इंजिनीअर्सच्या अटकेनंतर लवकरच या रस्ते घोटाऴ्यातील कंत्राटदारांवरही कारवाई होईल. असे सोमैया यांनी स्पष्ट केले.