किरीट सोमैयांनी फोडून दाखवली महापालिका घोटाळ्याची हंडी

गोविंदा आला रे
भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचारांची हंडी फोडली
किरीट सोमैयांनी फोडून दाखवली महापालिका घोटाळ्याची हंडी
मुंबईत दहीहंडींच्या जल्लोषात आज खा. किरीट सोमयांनी हर्षोत्सवात भांडूप, कोकण नगर येथील मुंबई महापालिका घोटाळ्याची 20 फूट उंचीची हंडी स्वत: फोडली. हंडी फोडण्यासाठी विशेष कसब लागते, ते आपल्या कृतीतून आज खासदारांनी करुन दाखवले.

गेल्या वर्षभरात मुंबई महापालिकेतील कचरा घोटाळा, टॅंकर घोटाळा, रस्ते घोटाळा, टॅब घोटाळा,नालेसफाई अशा अनेक घोटाळ्यांचा खा. सोमैयांनी पर्दाफाश केला. यापुढेही सर्वसामान्यांच्या पाठिशी उभं राहून अशा प्रकारच्या घोटाळेबांजावर कारवाई करतच राहणार असा विश्वास त्यांनी यावेऴी व्यक्त केला.