कमला मिल्समधील पबला लागलेल्या आगीची चौकशी करा

कमला मिल्समधील पबला लागलेल्या आगीची चौकशी करा
दोषी अधिका-यांवर कारवाई करा
कमला मिल्स आणि फोनिक्समिल कंपाउंडचे ताबडतोब फायर ऑडिट करा – किरीट सोमैया

कमला मिल्स पबच्या आगीच्या कारणाची चौकशी करा अशी मागणी खा.किरीट सोमैया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापालिका आयुक्तांना केली आहे. काल रात्री पबला लागलेल्या आगीत निष्पांना निव्वळ आग प्रतिबंधक व्यवस्था नसल्याने जीव गमवावा लागला.

ज्या महापालिका अधिका-याने त्याच्या फायर आणि रेस्टॉरन्टची एनओसी दिली त्यांच्यावर कारवाई करा.15 दिवसापूर्वी साकीनाक्याला फरसाणमार्टमध्ये अशीच आग लागली त्यावेळी 12-14 जणांचा अक्स्मात मृत्यू झाला होता.

मी महापालिका आयुक्तांना विनंती केली आहे की, सर्वच फरसाणमार्ट, पब आणि रेस्टॉरन्टचे ताबडतोब फायर ऑडिट करा आणि ज्यांच्याकडे अग्निप्रतिबंधक योजना नसेल त्यांचे परवाने रद्द करा. 
कमला मिल्समधील अनेक रेस्टॉरन्टस आणि पब हे अनधिकृतपणे सुरु आहेत. त्यांच्याकडे अग्नी प्रतिबंधक योजना नाहीत त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच ही अशी दुर्घटना घडली.
कमला मिल्सप्रमाणेच फोननिक्स मिल कंपाऊंडमध्येही अशी अवस्था आहे. दोन गेटस्पैकी एक गेट हे मारुती शोरुममुळे ब्लॉक झालय. या दोन्ही कॉम्प्लेक्स ताबडतोब फायर ऑडिट करण्याची मागणी खा. किरीट सोमैया यांनी केली आहे.

Fire at Pub at Kamala Mill Compound Mumbai I had urged CM & BMC Commissioner to Order Special Fire Audit of all such Pub, Hooka Parlours & Farsan Mart/Workshops of Mumbai. 2 week back similar type of fire at Farsan Workshop Sakinaka 1 dozen people had died

kamala mill pub fire-understood that several such establishments at kamla mills compound are illegal, part of which was regularised lately , the place where fire took place was illegal

Kamala Mills is a death trap. So many new restaurants opened without healthy fire safety system- Even
Phoenix Mill at Lower Parel is a death trap with only two exits. One exit at Maruti showroom is blocked – Fire Safety Audits for both Complex be conducted immediately.

kamlaa mill, raghuvanshi mill, maatulyaa mill, toddi mills, phoneix mills complexes have huge such illegal structures. i had requested BMC Commissioner to Order investigation of all these death traps. Nexus of BMC Mafias/Officials/Restaurant Owners.